Followers

Monday, 26 November 2012

सोबती सारे सुखाचे, आता समजले,
दुःखात कोणी नाही, आपणच आपले,
एकटेच असावे कायम, सोबत मन असावे,
मनाशी संवाद साधताना, दुःख विसरावे,
आनंदाच्या क्षणी सगळे प्रेम देतील,
स्वार्थ साधला कि लाथाडतील,
आपले म्हणता कधी परके होतात समजत नाही,
सवय असते आपल्यांची, सत्य मानण्यास मन धजत नाही,
एकट्याने एकट्यासाठी जगावे कायम, पण जगास प्रेम द्यावे,
अलिप्त पणा जपावा, भगवंतास स्मरावे,
तो कधी एकट आपल्याला सोडत नाही,
तो हृदयी आहे आपल्या ह्याची मनास जाणंच नाही,
दुःखाची चिंता आता गेली लयाला,
मन धावते भगवंताकडे, एकटेपणा घालवायला.......
--भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment