जीवन ....
पाण्यासारखं निर्मळ असतं,
समुद्रासारखं खोल असतं,
व्याख्या करता येत नाही त्याची,
कारण अवकाशासारखं विशाल असतं,
गर्भात उगम पावून,
अंतास मातीत मिसळणार असतं,
जगण्याच्या अर्थाची उकल,
काढायला लावणारं ते एक कोडं असतं........
जीवन हे अस असतं.........
--भूपेंद्र परांजपे
No comments:
Post a Comment