Followers

Monday, 26 November 2012

माणसांमध्ये असताना मी एकटा का असतो,
आठवणींत तिच्या मी माझा नसतो,
हळुवार फुंकर घालायची ती माझ्या जखमांवर,
का वार केला मी तिच्या वर्मावर,
काट्यांची वाट आता..लाथाडले मी गवताच्या लाटेला,
थंड होती सावली ती,आता समोर जातोय धगधगत्या सुर्याला,
वेदना होती चालताना,रक्त सडा शिंपडतो;
चालता आठवणींत तिच्या, काट्यांचा मउ कापूस होतो,
.......आठवणीत तिच्या मी माझा नसतो.........
--भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment