आयुष्यात तू आलीस, न् आयुष्याच बदलून गेलीस,
काट्यांच्या वाटेवर फुलांचे ताटवे,
न् वादळात भरकटलेल्या जहाजाचे सुकाणे होऊन गेलीस,
आयुष्याच्या ह्या वाटेवर तुझ्या कणखर मनाची सोबत,
न् संकटांवर मात करण्याचा विश्वास देऊन गेलीस,
सोबती होतीस तू म्हणून इथवर आलो,
सोडताना ती अनेक आठवणी सोडून गेलीस,
डोळे पाणावले माझे जेव्हा........
तेव्हा कधी पावसाच्या थेंबाने,उन्हातल्या सावलीने हजारदा स्पर्शून गेलीस....
न् तू सोबत कायम माझ्या ह्याची जाणीव देऊन गेलीस.........
-भूपेंद्र परांजपे.

No comments:
Post a Comment