Followers

Tuesday, 27 November 2012

अव्यक्त प्रेम

ती खुणावायला यायची मला,
तिच्या डोळ्यातील भाषा कधी उमगली नाही,
जेव्हा चिडायची ती,
कारण कधी कळलेच नाही,
खूप काही सांगायची मला,
मन तिचे कधी मी जाणलेच नाही,
अचानक दूर निघून गेली ती,
माझ्या हृदयातून गेली नाही,
माझे प्रेम होते तिच्यावर,
कधी मी व्यक्त केलेच नाही..
       --भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment