Followers

Monday, 26 November 2012

रोज जगायचे रोज मारायचे,
मग कोणासाठी रडायचे न् हसायचे,
काट्यांवर चालणारे पाय स्वार्थासाठी रक्तात भिजवायचे,
सुखासाठी धडपड पण सुखाचा थांग लागत नाही,
डोंगराएवढे दुःख मात्र उगाच पदरी बाळगायचे,
भोग-वस्तूंमध्ये आनंद परमानंद विस्मरणी,
व्यर्थ उदासीनतेचे गीत गुणगुणायचे......
--भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment