थोडा अडकलोय, जरासा फसलोय, किंचितसा गुंतलोय, तिच्या हृदयात,
हलकेच टोचणे, नाजुकसे बोलणे, नजरेचे इशारे, वार करिती माझ्या हृदयात,
तिचे मधुर हास्य, मौनातलेही गोड भाष्य, घर करिती मनात
कल्लोळ भावनांचे, अव्यक्त शब्दांचे, दाटून येती डोळ्यात..
काहूर विचारांचे, शल्य विरहाचे, बाहेर पडती अश्रू रूपात................
-- भूपेंद्र परांजपे
No comments:
Post a Comment