ते दूर देशी गेले,
स्वदेशाला मात्र विसरून गेले,
स्वदेशात काहीच नाही अशी समजूत आहे त्यांची,
शिक्षण आणि संस्कार मात्र इथूनच घेऊन गेले,
रुपया फार छोटा वाटतो आवडतात ह्यांना डॉलर.
वर्षातून सुट्टी काढून येताना, टाईट असते ह्यांची कॉलर,
मातृभूमीला असे हे सहज कसे विसरतात,
असे अनेक प्रश्न मनाला पडतात,
मुतृभूमिचे संस्कार कुठे कमी पडले,
कि ते दूर देशी गेले.......!!!!
--भूपेंद्र परांजपे
मातृभूमीला असे हे सहज कसे विसरतात,
असे अनेक प्रश्न मनाला पडतात,
मुतृभूमिचे संस्कार कुठे कमी पडले,
कि ते दूर देशी गेले.......!!!!
--भूपेंद्र परांजपे
No comments:
Post a Comment