Followers

Monday, 26 November 2012

टाकुनी जुने वस्त्र नवे परिधान करतो,
आत्मा हि तसे शरीररूपी वस्त्र बदलतो,
जुने टाकुनी नवे आत्मसात करतो,
परी नव्याचा पाया हा जुनाच असतो,
जन्मोजान्मान्तारीचे नाते तुटत नाही,
ऋणानुबंधाचे बंध सुटत नाही.
नाजूक रेशीमगाठ बांधली जाते कोणाबरोबर,
गाठीत वेढलो जातो स्वतःबरोबर,
कुठे कोणाशी गाठ पडेल सांगता येत नाही,
मृत्युही कवेत घेतो थांगपत्ताही लागत नाही......
----भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment