Followers

Friday, 8 November 2013

मोही मना...



सुहास्य ते वदनी,
मोही मना....
खुला केशसंभार तो...
मोही मना...
मृग नयन ते ..
मोही मना...
तुझे सुमधुर बोलणे..
मोही मना...
तुझ्यात गुंतलो असा
जणू चक्रव्यूहात अडकलो...
कसा घेतला ताबा तू हृदयाचा..
हेही न जणू शकलो....
असे तुझे रूप हे...
मोही मना......
  --भूपेंद्र परांजपे

Thursday, 8 August 2013


आता सूड हवा....
त्या प्रत्येक सांडलेल्या रक्ताच्या थेंबाचा..
त्या मातांनी फोडलेल्या हम्बरड्याचा ..
देशाने गमावलेय वीर पुत्रांचा..

आता सूड हवा....
घुसखोरी करण्यारा गनिमाचा..
मात्रुभूमिकडे वाकड्या नाजेरे बघणाऱ्या शत्रूचा..
आणि विनाकारण बाळगल्या जाणार्या अहिंसेचा...

आता सूड हवा.....!!!!

Sunday, 3 March 2013

फडकतो तिरंगा किल्ल्यावर,मनात कधी फडकेल का.



फडकतो तिरंगा किल्ल्यावर,मनात कधी फडकेल का..
राष्ट्रनिष्ठा काय असते,हे कधी समजेल का...
परकीयांचे अंधानुकरण, हे कधी थांबेल का..
बेशिस्त वर्तन अमुचे, शिस्त कधी लागेल का...
परदेशात नोकरीची स्वप्ने, स्वदेशात कधी बघतील का..
परदेशात वर्तन शिस्तीचे, स्वदेशात कधी वागतील का...
स्वदेशात शिक्षण उत्कृष्ट, फायदा स्वदेशाला मिळेल का.
देशरक्षणासाठी सैनिक पडती धारातीर्थी, शहादत त्यांची समजेल का..
पडती असंख्य प्रश्न उत्तर कधी गवसेल का..
फडकतो तिरंगा किल्ल्यावर,मनात कधी फडकेल का..
                     --भूपेंद्र परांजपे

Sunday, 9 December 2012

समीप तुझ्या आहे मी, तरी का शोधतेस मला,
भिरभिरते का नजर, अंतर्मनात डोकाव जरा,
तुझ्या रोमारोमात मीच असे,भान कसे नुरले तुला,
नको शोधूस इतरत्र, तुझ्यात वास करतो खरा,
अर्ध्यावाटेत सोडीला, हात तू माझा खरा
सोबत हवी होती तुझी,झिडकारले तू मला,
निर्णय तुझा ठाम होता,स्वप्नांचा झाला चुरा,
मागे वळूनी पाहत होतो,शेवटची नजर भिडवाशील का जरा...
चित्त तुझे लागत नाही, निर्णय डळमळीत झाला,
प्रेमच असे अपुले,काहूर झाले चित्ती तुझ्या,
उभा आहे वाटेवर, हात तुझा धरायला,
सखे एकरूप होऊ, आयुष्याचा प्रवास करायला.....
--भूपेंद्र परांजपे
हे अंबे जगद-जननी ,ठेवी तुझा वरद-पाणी,
आम्हा बालकांवर,
आम्ही लेकुरे अजाण तुझी, सारे अपराध क्षमा करी,
कृपा आम्हावर तुझी राहो निरंतर,
सुबुद्धी आम्हास दे, दुष्टबुद्धी विनाशु दे,
चित्त अमुचे सदा राहो स्थिर,
आदिशक्ती तू, असुर-मर्दिनी तू,
अंबे असेच रक्षण कर,
सदा घडो तुझे स्मरण, आलो तुला शरण,
घालितो लोटांगण चरणांवर.......
-भूपेंद्र परांजपे
सुखाचा माग काढतो मी,
त्यास गाठण्यासाठी वाट्टेल ते करती मी,
सुख म्हणजे काय ते माहित नव्हते,
उकल त्याची काढण्यासाठी झटत होतो मी,
सुखास गाठले परी हव्यासास नाही जिंकलो,
सुखाच्या हव्यासापायी भटकत होतो मी,
सुख असते केवळ मृगजळ, फार उशिरा समजले,
जेव्हा आयुष्याच्या अंतास पोहोचलो मी,
सुख म्हणजे जगाला प्रेम देणे, अपेक्षा न बाळगता,
उशिरा आलेल्या शहाणपणाचा उपदेश देत होतो मी.......
-भूपेंद्र परांजपे.

Friday, 30 November 2012

पहिली ओळख एका अनोळखीशी, बघता बघता साथ मिळते प्रेमाची,
दिवस सरतात महिने जातात, मनातील भाव समजू लागतात,
न बोलता हृदयाची भाषा समजू लागते, प्रेमाचे बंध असे जोडले जातात..
त्यातूनच नवे नाते फुलात जाते, अलगद गुंफते गाठ रेशिमगाठीची..............