Followers

Monday, 26 November 2012

चंद्रमेघांची सावली गडद होती,
त्या सावलीत चांदणी साद देत होती,
तिचा प्रकाश मार्ग दाखवत होता,
सावलीच्या मागे उजेड असतो सांगत होता,
प्रकाशास पाहायची दृष्टी तुला जिंकायची आहे,
वाईट आणि चांगले ह्याची जाण् ठेवायची आहे,
यत्न केलेस तर यश सहज गवसेल,
सावलीतला चंद्र हि पूर्ण दिसेल,
सावली सोबत नाही सोडत, माणसे सोबत सोडतात........
सावली जितकी गडद तितका तू तेजोमय,मेघ सांगून जातात............!!!
--भूपेंद्र परांजपे

No comments:

Post a Comment